वृद्धाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
झाडावरुन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाची आठवडाभर न मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. शिवाजी बाळका ठोंबरे (७४, ठोंबरेवाडी, साठरे बांबर, ता. रत्नागिरी) असे त्यांचे नाव आहे.
शिवाजी ठोंबरे २० फेब्रुवारी रोजी आंब्याच्या झाडावरुन खाली पडले होते. त्यांच्या डोक्याला, तोंडाला, दोन्ही हातांना दुखापत झाली होती. त्यांना बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना २७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.