• Total Visitor ( 134007 )

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांत होणार गारपिटीचा पाऊस

Raju tapal December 24, 2024 59

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांत होणार गारपिटीचा पाऊस

महाराष्ट्रात पुढच्या तीन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

24 डिसेंबरला हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, 26 आणि 27 डिसेंबरला उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.

सध्या देशात हवामानाची स्थिती पाहिली, तर उत्तर भारतात 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'चा प्रभाव जाणवतो आहे आणि दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी वादळं किंवा झंझावात होय. हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या या वादळांमुळे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव होतो तर उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो.

29 सप्टेंबर 2021 सध्या महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पश्चिमेला अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवा एकमेकांना भिडल्यामुळे पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात 'या' जिल्ह्यांमध्ये अलर्ट

त्यामुळेच हवामान विभागानं 26 डिसेंबरला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे.

तर 27 डिसेंबरला अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

त्याशिवाय २८ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, ढगाळ हवामानामुळे राज्यातलं किमान तापमान किंचीत वाढून थंडी कमी होईल आणि पूर्ण राज्यभर उबदार हवामान राहण्याची शक्यताही आहे.

पण वर्षाअखेरीस म्हणजे 30 डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यताही काही हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

गारपीट कशामुळे होते?

बाष्पयुक्त वारे आणि थंड वारे एकमेकांना भिडल्यानं हवा वर जाते आणि उंच ढग निर्माण होता. अशा ढगांची उंची खूप जास्त असेल, तर त्यातून गारांची निर्मिती होते आणि त्या खाली कोसळल्यावर गारपीट होते.

हे नेमकं कशामुळे होतं? थोडक्यात सांगायचं, तर ढग उंचावर जातात, तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. ते वाऱ्यासोबत एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात. ते गोठल्यामुळे गार तयार होते.

गारेचं वजन खालून येणाऱ्या वाऱ्याच्या झोतावर मात करतं, तेव्हा ती ढगातून खाली पडते. 

गारपीट आणि पावसामुळे अनेकदा फळबागा, ऊस, कांदा आणि रबी पिकांचं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसतो. अवकाळी पाऊस म्हणजे काय? तसेच, गारपिटीमागे कोणती कारणे असतात

'ला निना'चा प्रभाव जाणवेल का?

यंदा डिसेंबरमध्ये राज्यातलं कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा थोडं जास्त राहील, मात्र काही दिवस थंडीचा तडाखा जाणवेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता.

त्यानुसार राज्यातही थंडीचा तडाखा जाणवला तरी काहीवेळा दिवसा उष्णताही जाणवली.

आता जानेवारीत पॅसिफिक महासागरात 'ला निना' प्रवाह तयार होण्याची दाट शक्यता जगभरातल्या वेगवेगळ्या हवामान संस्थांनी वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागानंही जानेवारी-फेब्रुवारीत 'ला निना' तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, तो अल्पजीवी राहील आणि तीव्रता कमी राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्याविषयी माहिती देणारा 

ला निनाच्या काळात भारतात जास्त थंडी आणि जास्त पाऊस पाहायला मिळतो.

 

 

 

 

 

 

Share This

titwala-news

Advertisement