आंबिवलीत शुल्लक कारणाने तिघांना जबर मारहाण
फिर्यादी बाळाराम सुतार यांचा खांदा व हात फॅक्चर
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबिवली येथील मारुती मंदिरा जवळ राहणारे फिर्यादी बाळाराम पुंडलिक सुतार (वय ३५) त्यांची पत्नी मंदा व मुलगा अंशू यांना जबर मारहाण केल्याची घटना काल शनिवारी सकाळी साडे आकाराच्या सुमारास घड्सली असून याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी बाळाराम पुंडलिक सुतार हे आपल्या घराशेजारील मारुती मंदिरातून दर्शन घेऊन येत असताना त्यांनी त्यांच्या शेजारी राहणारे रवी पाटील यांना तुमच्या मुलाने आमच्या घरी येऊन भांडण लावले असे बोलले असता फिर्यादी बाळाराम पुंडलिक सुतार,त्यांची पत्नी मंदा व मुलगा अंशू यांस रवी पाटील यांचा मुलगा साहिल रवी पाटील तसेच रवी पाटील यांची पत्नी गौरी यांनी ठोश्या बुक्याने जबर मारहाण केली. सदरील घटनेत बाळाराम सुतार यांना मुक्का मार लागला असून त्यांच्या डाव्या खांदा व उजव्या हाताची बोटे फ्रॅक्चर झालेले असून त्यांच्यावर मोहण्यातील गणपती इस्पितळात उपचार सुरु आहेत.
दरम्यान अचानक झालेल्या या मारहाणीमुळे सुतार कुटुंबीय भयभीत झालेले असून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र लाडकर हे करीत आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्याकडे विचारणा केली असता सदरील घटनेच्या चौकशीसाठी पोलीस हवालदार लाडकर यांना गणपती इस्पितळात जाऊन सदरील जखमीचे जबाब नोंदवून तसेच डॉक्टरांचे रिपोर्ट बघून वाढत असलेले कलम लावण्याचे सांगितले आहे.