तीन घरफोड्यांमधील दोन चोरट्यांवर गुन्हे
तीन घरफोड्यांमधील दोन चोरटःयांवर वालचंदनगर पोलीसांनी गुन्हे दाखल करून त्यातील एकाकडून १ लाख ८७ हजार ४१० रूपयांचा ऐवज हस्तगत केला. यामध्ये पावणेपाच तोळे सोन्याचे दागिने व ११ हजार रूपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.
अज्ञात चोरट्यांनी १८ डिसेंबर २०२१ रोजी गोतोंडीमध्ये अफसाना दिलावर शेख यांच्या घरी भरदिवसा चोरी करून १ लाख ३२ हजार ५६० रूपयांचा ऐवज चोरीला गेला होता. यामध्ये ४१ हजार रूपये रोख रक्कम ,दीड तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता.
२९ डिसेंबर २०२१ रोजी सणसरमध्ये मुस्ताफा अकबर सय्यद यांच्या घरी चोरी करून १ लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रकमेचा समावेश आहे.
२७ जानेवारी २०२२ रोजी सणसर गावामध्ये संभाजी शिवाजी आडके यांच्या घरी चोरी करून ४७ हजार ८०० रूपयांचे दागिने मोबाईल व रोख रक्कम लंपास केली हैती.
आडके यांच्या घरफोडीप्रकरणी नियोजन उर्फ बेड्या संदीप भोसले वय - २८ रा.सोनगाव ता.बारामती याला वालचंदनगर पोलीसांनी जेरबंद केले.
सणसरमधील दोन ठिकाणी ,गोतोंडीमध्ये एका ठिकाणी लखनबापू उर्फ विजय काळे वय - २५ रा.आटपाडी जि.सांगली याच्या मदतीने चोरी केल्याची त्याने कबुली दिली.
लखन काळे हा फरारी असून त्याच्या मागावर पोलीस आहे.
वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूरे पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे नितीन लकडे सहाय्यक फौजदार शिवाजी निकम यांनी प्रयत्न करून तपास लावला.