संतदास उपाख्य हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना
राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
आळंदी (गौतम पाटोळे) :- संतदास उपाख्य पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांची साहित्यातील संस्कृत,हिंदी व मराठी असे त्रिवेणी संगमातील साहित्यिक योगदान पाहून संत वृत्तीला शोभणारा असा "राज्यस्तरीय संत तुकाराम महाराज गौरव पुरस्कार २०२६" जाहीर झाला आहे. येत्या २३ ऑगस्ट २०२६ रोजी केएसआय पब्लिकेशन कोल्हापूर संस्थेतर्फे पुरस्कार आळंदीत प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी होत असलेल्या संमेलनात साहित्यिक केएसआय पब्लिकेशनचे अध्यक्ष विलास पाटील इंगळीकर यांचेसह साहित्यिक,मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे. सन्मान जाहीर झाल्याने हिंगणकर महाराज यांचे चाहत्यांचे फोनवर आणि सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराज कीर्तनकार,प्रवचनकार असून अतिशय हलाकीच्या परिस्थितीत त्यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी शिक्षण घेतले. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश,ऋषिकेश,हरिद्वार येथे ही संस्कृतचे पानिनी व्याकरण शास्त्राचा गाढा अभ्यास त्यांनी केला आहे. वारकरी सांप्रदायची परंपरा राखत अनेक अभंग,गवळणी,संस्कृत सुभाषिते व सामाजिक विश्वाची जाण ठेवून लिखाण त्यांनी केले आहे. त्यांची वासुदेव पासष्टी,अभंग निर्झर भाग १,अभंग निर्झर भाग २ व येत्या २३ ऑगष्ट रोजी प्रसिद्ध होणारा संस्कृत ग्रंथ सुभाषित मकरंद अशी ग्रंथ संपदा असून त्यांची शोषल मीडियावर अनेक अभंग,गवळणी,संस्कृत सुभाषिते प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या साहित्याततून जगाला संत साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. पुरस्कार जाहीर झाल्या निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड विष्णू तापकीर,नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर,आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे,सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर,माऊली घुंडरे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.