कांदिवलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू...
ठाकूर व्हिलेजमधील अल्पिन टॉवर येथील घटना,पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद,तपास सुरू...
राजू टपाल.
मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील ठाकूर व्हिलेज परिसरातील अल्पिन टॉवरमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास अल्पिन टॉवर येथे एका अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टॉवरमधील रूम क्रमांक २८०४ येथे कु.श्राव्या मुकुल मेहता (वय १५) ही मुलगी गंभीर अवस्थेत आढळली. नातेवाईकांनी तिला तातडीने कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,पहाटे २ वाजून २२ मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच रुग्णालयात मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला असून, शवविच्छेदनाची प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. मृतदेह शवागारात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.दरम्यान,मृत मुलीच्या वडिलांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून,त्यांनी कोणताही संशय व्यक्त केलेला नसल्याचे पोलिसांच्या निवेदनात नमूद आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून,पुढील तपास पोलीस करीत आहेत.