• Total Visitor ( 84717 )

ट्रक ने धडक दिल्याने मोटारसायकल स्वाराचा मृत्यू

Raju Tapal February 13, 2023 55

ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू ; कोरेगाव भीमा येथे पुणे - नगर महामार्गावर अपघात
           ------------------
ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने ट्रकखाली अडकून ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.
निखिल जिवराव रावत वय - २५ रा.खारघर नवी मुंबई सध्या रा.मगरपट्टा सिटी पुणे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीवरील प्रवाशाचे नाव असून शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील नदीवरील पुलाच्या पुढे पुणे - अहमदनगर महामार्गावर हा अपघात झाला.
प्रशांत शिवाजी जाधव वय - २९ वर्षे  ,सध्या रा.कॅप्सूलनगरी पळशी रोड,शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा मूळ रा.नळवाडी   ता.उमरगा जि.उस्मानाबाद यांनी या अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ए एस आय अविनाश थोरात यांनी दिलेल्या माहितीनूसार तसेच फिर्यादी प्रशांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार , फिर्यादी प्रशांत जाधव व त्यांचे मित्र निखिल जिवराव रावत  हे दोघे त्यांचा मित्र महादेव आप्पा बिरादार यांची मोटारसायकल नं. KA -51 HH -8226 वरून रामराजे देशमुख याचे लग्नाकरिता सुकळी जि.अहमदनगर येथे निघाले होते.त्यावेळी मोटारसायकल फिर्यादी प्रशांत जाधव चालवत होते. कोरेगाव भीमा येथील नदीवरील पुलाच्या पुढे पुणे - अहमदनगर रोडवर आले असता पाठीमागून येणा-या वाहनाने मोटारसायकलला पाठीमागून धडक फिर्यादी प्रशांत जाधव व त्यांचे मित्र निखिल जिवराव रावत हे दोघे खाली पडले. त्यावेळी ट्रकवरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक न थांबवता तसाच पुढे नेला त्यावेळी निखिल हा ट्रकच्या खाली अडकला होता.त्याच्या अंगावरून ट्रक गेला. या अपघातात फिर्यादी प्रशांत जाधव यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला ,हाताला,कमरेला मार लागला.निखिल हा रोडवर मध्ये पडला होता. त्याच्या डोक्यास ,कमरेस गंभीर दुखापत झाल्याने त्याची काही एक हालचाल होत नव्हती असे फिर्यादीत म्हटले आहे.
ट्रक हा निष्काळजीपणे, हयगयीने,वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून मोटारसायकलला पाठीमागून धडक देवून अपघात करून अपघातात निखिल जिवराव रावत वय -२५ रा.खारघर नवी मुंबई यांचे डोक्यास ,व कमरेस गंभीर दुखापत होवून मृत्यूस कारणीभूत झाला. तसेच माझा उजवा पाय,हातास कमरेस किरकोळ दुखापतीस ,मोटारसायकलीच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून ट्रक नंबर MH-12 KP 4998 ही वरील चालक प्रफुल्ल चंद्रकांत निकाळजे सध्या रा.खेडकरमळा उरूळीकांचन ता.हवेली मूळ रा. घिखली ता.पाटोदा जि.बीड याच्याविरूद्ध कायदेशीर फिर्याद असल्याचे फिर्यादी प्रशांत शिवाजी जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे

Share This

titwala-news

Advertisement