• Total Visitor ( 693777 )
News photo

टिटवाळ्यातील शिवपार्वती परिसरातील ट्रान्सफॉर्मरची अखेर दुरुस्ती

Raju Tapal publisher September 06, 2026 25

टिटवाळ्यातील शिवपार्वती परिसरातील ट्रान्सफॉर्मरची अखेर दुरुस्ती



‘टिटवाळा न्यूज’च्या बातमीची दखल; महावितरणकडून जुन्या व जळालेल्या कटआउट्सची केली दुरुस्ती



राजू टपाल.



टिटवाळा:- टिटवाळा रिजेन्सी परिसरातील शिवपार्वती इमारतीलगत असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये वारंवार बिघाड होऊन डीओ जाण्याच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. शिवपार्वती,ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी तसेच रिजेन्सी सर्वम परिसरातील इमारतींचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होण्याबरोबरच घरातील विद्युत उपकरणांमध्येही बिघाड होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

या समस्येबाबत ‘टिटवाळा न्यूज’ने वृत्त प्रसिद्ध करून महावितरणचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर महावितरणकडून रविवारी संबंधित ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यात आली.

महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ बळीराम खडके आणि रवी लेंडे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी काम करत ट्रान्सफॉर्मरमधील जुनाट,जळालेले व नादुरुस्त कटआउट्स तसेच इतर आवश्यक साहित्य बदलून नवीन उपकरणे बसविली. ट्रान्सफॉर्मरची आवश्यक दुरुस्ती करून विद्युत व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यात आली. या दुरुस्तीमुळे परिसरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवपार्वती, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी आणि रिजेन्सी सर्वम परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन दुरुस्तीचे काम केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी महावितरणचे आभार मानले आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026