शहीद दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे :- शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने,उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के- पाटील,शशिकांत गायकवाड,वरूणकुमार सहारे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने,तहसिलदार सचिन चौधर,रेवण लेंभे,मीनल दळवी,कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम थोरात,लेखाधिकारी आश्लेषा जाधव,राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे संचालक घनश्याम मेहता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.