तृतीयपंथीयाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक ; शिक्रापूर ता.शिरूर येथील बजरंगवाडीतील घटना
बजरंगवाडी,शिक्रापूर येथील तृतीयपंथीयाच्या खूनप्रकरणी शिक्रापूर पोलीसांनी दोघांना अटक केली. आशू उर्फ अनिश रामानंद यादव वय - २३ रा.बजरंगवाडी शिक्रापूर ता.शिरूर असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव असून धर्मू जोहितराम ठाकूर वय - २०, युगल लालसिंग ठाकूर वय -१९ दोघेही रा.बजरंगवाडी , शिक्रापूर ता.शिरूर मूळगाव ढाबा, छत्तीसगड अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तृतीय पंथीयाच्या मृतदेह रविवारी सकाळी १० वाजता आढळून आला होता. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे या घटनेचा तपास करीत आहेत.