पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारी सेंद्रिय खते देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते उपलब्ध होत नाहीत.
साधारणपणे एक हेक्टर उसाच्या क्षेत्रामध्ये ८ ते १० टन पाचट मिळते, हे जाळून न टाकता त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडण्यासाठी क्षेत्राची उपलब्धता, हिरवळीचे पीक व नंतर घ्यावयाचे पीक यासाठी पुरेसा वेळ हवा असतो. वरील सर्व अडचणी व मर्यादा लक्षात घेत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे उसाच्या पाचटात ०.४o ते ०.५० टक्के नत्र, 0.१५ ते ०.२० टक्के स्फुरद आणि o.९ ते १ टक्के पालाश तसेच ३२ ते ४0 टक्के सेंद्रिय कर्ब असते.
त्यानुसार दरेकरवाडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री तीरसिंग जवळकर यांची शेतात ऊस पाचट व्यवस्थापन अंतर्गत पाचट कुट्टी करत असताना प्रक्षेत्र भेट कृषी सहाय्यक श्री नवज्योत आगे यांनी आयोजित केली होती सदर भेटीस उपविभागीय कृषी अधिकारी, खेड श्री मनोजकुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी श्री सिद्धेश ढवळे, मंडळ कृषी अधिकारी श्री अशोक जाधव, कृषी पर्यवेक्षक श्री सुनील मोरे उपस्थित होते. ऊस पाचट कुट्टी केल्यानंतर युरिया, एस एस पी व जैविक कल्चर चा उपयोग पाचट कुजविण्यासाठी करण्याचा सला उपस्थित शेतकरी बांधवांना देण्यात आला तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करण्याबाबत आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.