• Total Visitor ( 84875 )

ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Raju Tapal December 24, 2021 60

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे कृषी विभागामार्फत ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न 
    
कृषी विभागाच्या वतीने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामपंचायत कार्यालय ,गणपती मंदिरात आयोजित करण्यात आलेला ऊस पाचट व्यवस्थापन व विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम बुधवार य्दिनांक 22/12/ 2021 संपन्न झाला. 
आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास   मंडळ कृषी अधिकारी अशोकराव जाधव ,जातेगावचे कृषी सहाय्यक सुभाषराव सुतार , कोंढापुरी येथील  कृषी सहाय्यक आर सी कारंडे , महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचे धनंजय गायकवाड , ग्रामपंचायत सदस्य राहुल दिघे, माजी उपसरपंच अर्जुनराव गायकवाड ,विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन ,माजी पोलीस पाटील  बाळासाहेब  गायकवाड, प्रकाश घाडगे ,रामचंद्र गायकवाड, मधुकर गायकवाड, योगेश जाधव ,सुभाषराव गायकवाड ,सतिश गायकवाड, नाना गायकवाड, स्वप्निल  लवांडे,विलास दिघे, श्रीकांत पवार,  जनार्दन जुनवणे, विनायक गायकवाड, आत्माराम अडसूळ, विजय गायकवाड, सुरेश गायकवाड ,सुरेश घाडगे, राजाराम गायकवाड, सोमनाथ गायकवाड ,विनोद कांबळे अनिल सांगडे आदींसह शेतकरी उपस्थित होते. 
मंडळ कृषी अधिकारी अशोकराव जाधव यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना  सांगितले की, ऊस पाचट शेतात कुजवल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीचा आरोग्य चांगले होते जमिनीत पाणी टिकून राहते. 100 टन ऊसाचे उत्पादन झाल्यास त्या मधून आपल्याला 10 टन ऊस पाचट शेतामध्ये उपलब्ध होते .म्हणजे   ऊसाच्या उत्पादनाच्या दहा टक्के ऊस पाचट शेतामध्ये राहते.साधारण  दहा टन पाचट कुजवल्यास आपणास चार ते पाच टन शेतात कुजलेले खत उपलब्ध होते .आपण हे पाचट जाळून मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत . ऊस पाचट जाळल्यामुळे  जमिनीतील मातीत असणारे उपयुक्त  जीवाणू नष्ट होतात .एक ते दीड फुटापर्यंत जमीन जाळले जाते .ऊस पाचट जाळल्यामुळे खोडवा ठेवायचा असतो तो खोडव्याचे खोडवे थोडेसे जळाले जातात त्यामुळे फुटवे कमी येतात .आलेले फुटवे पिवळे येतात. व उत्पादनात घट होते.दहा टन ऊस पाचट कुजण्यासाठी 80 किलो युरिया 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि तीन लिटर जिवाणू कल्चर वापरावेअसे अशोकराव  जाधव  यांनी सांगितले. जिवाणू कल्चर युरिया आणि सिंगल सुपर वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे ऊस पाचट कुजते. ऊस पाचटावरती युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे त्यानंतर जिवाणू कल्चर ची स्प्रे पंपाच्या साह्याने फवारणी करावी.आपण शेतामध्ये जास्त रासायनिक खताचा वापर करत आहोत त्यामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे .आपल्या शेतामध्ये पाचटाचे व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करून, शेतात सेंद्रिय कर्ब उपलब्ध करून देऊ शकतो ,जमिनीचा पोत सुधारू शकतो ,जमिनीची कार्यक्षमता वाढू शकते. असे अशोकराव जाधव यांनी सांगितले. कृषी सहाय्यक सुभाषराव  सुतार यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली .महाडिबी अर्ज कसा करावा, कोणकोणत्या अवजारांसाठी अर्ज करता येतो या विषयी माहिती दिली. महाडीबीटी वरती ट्रॅक्टर, ट्रॅक्‍टरचलित अवजारे ,पावर टिलर ,रोटावेटर ,ठिबक सिंचन पॉली हाउस ,तुषार सिंचन, शेततळे अस्तरीकरण अशा विविध घटकांसाठी शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात. योजना एक अर्ज अनेक या योजनेअंतर्गत महाडीबीटीवरती शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत असे कृषी सहाय्यक सुभाषराव  सुतार यांनी आवाहन केले .महात्मा गांधी फळबाग योजना अंतर्गत शेतकरी फळबाग लागवड विविध फळ लागवड करू शकतात. गोपीनाथ मुंडे अपघात विमायोजनांची माहिती देण्यात आली. गोपीनाथ मुंडे विमायोजनेंतर्गत ज्या शेतक-याचा अपघाती मृत्यू होतो अशा शेतकऱ्यांस शासनातर्फे दोन लाख रुपये अनुदान देण्यात येते अपघात झालेल्या शेतकऱ्यांच्या नावावर  7 बारा 8 अ असणे आवश्यक आहे. कृषी सहायक सुतार यांनी प्रकाश सापळे याचे महत्त्व सांगितले.प्रकाश सापळे प्रत्यक्षात शेतामध्ये कशा प्रकारे लावावे याचे प्रात्यक्षिक  करुन दाखवले .प्रकाश सापळयानेआपणास कमी खर्चात किड नियंत्रण करता येते असे सांगितले.  धनंजय गायकवाड यांनी ,त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या शेतामध्ये राबविलेल्या  ऊस पाचट व्यवस्थापनाविषयी  मनोगत व्यक्त केले. धनंजय गायकवाड यांनी असे सांगितले की त्यांनी दीड एकरावर  प्रत्यक्षात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे ऊस पाचट व्यवस्थापन केले  ते चांगल्या प्रकारे कुजली आहेत. त्याचा फायदा झाला आहे असे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करावे असेही शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत एनपीके जिवाणू व प्रकाश सापळे वाटप करण्यात आले.सूत्रसंचालन ग्रामपंचायत  राहुल दिघे यांनी केले . राहुल दिघे यांनी उपस्थित अधिकारी व  शेतक-यांचे आभार मानले.

Share This

titwala-news

Advertisement