उभ्या असलेल्या ट्रकमधून ऍल्युमिनियमचे भंगार चोरीस
उभ्या असलेल्या ट्रकमधून १० लाख ४० हजार रूपये किंमतीचे आँर्डनन्स फॅक्टरीतील ऍल्युमिनियमचे भंगार चोरीस गेल्याची घटना मंगळवारी रात्री चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपासमोर घडली.
ओडिशा येथील आँर्डनन्स फॅक्टरीतून अँल्युमिनियम तार व इतर भंगार असे एकूण २६० बॉक्स ट्रक क्रमांक एम एच ०६ ए सी ५९५१ अंबरनाथ येथे नेले जात होते.
मंगळवारी रात्री साडेबारा ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान हा ट्रक चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावरील नक्षत्र पेट्रोलपंपासमोर उभा होता.
त्यावेळी ट्रकच्या पाठीमागील प्लॅस्टिकची ताडपत्री व दोर कापून चोरट्यांनी साहित्य चोरून नेले.
ट्रकचालक प्रकाश उर्फ हिरामण देवचंद भोई रा.पाडळसे ता. यावल जि.जळगाव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ए एस आय भालचंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.