युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला
रशिया हादरले;
प्रत्युत्तरदाखल पुतिन यांच्या सैन्याने युक्रेनचे ३३७ ड्रोन पाडले
मॉस्को :-रशिया आणि युक्रेन यांच्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धामध्ये दररोज लहानमोठ्या चकमकी घडत आहेत. दरम्यान, युक्रेनने मंगळवारी रशियावर एक मोठा ड्रोन हल्ला घडवून आणला असून, रशियन सैन्यानेही कारवाई करत देशाच्या दहा विविध भागात मिळून ३३७ युक्रेनी ड्रोन पाडले आहेत.
मागच्या तीन वर्षांमध्ये युक्रेनने रशियावर केलेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. एकीकडे युक्रेनचं एक प्रतिनिधी मंडळ रशियासोबत तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्याबाबत अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेणार असतानाच दुसरीकडे हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याबाबत युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने कुठलंही विधान करण्यात आलेलं नाही. रशियन एअर डिफेन्सने जवळपास 58 ड्रोन्स नष्ट केले आहेत.
युक्रेनकडून सतत हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यांमुळे मॉस्को एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे. अनेक विमान उड्डाण प्रभावित झाली आहेत. या हल्ल्यात किती जिवीतहानी झालीय, त्या बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. या हल्ल्यांमुळे जेद्दा येथे होणारी शांतता चर्चा प्रभावित होऊ शकते. रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ झालाय. सौदी अरेबियात आज अमेरिका, युक्रेन आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. शस्त्र संधी करारावर या बैठकीत एकमत होईल अशी अपेक्षा आहे. शांतता चर्चेसंबंधी अमेरिकी आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. पण आता होणारी चर्चा निर्णायक मानली जात आहे. कारण राष्ट्रपती जेलेंस्की स्वत: सौदी अरेबियात उपस्थित आहेत.