वाघवाडी गावात दोन पाइपलाइन असून देखील सुद्धा महिलांना डोक्यावरचं पाणी आणावे लागते
मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वाघवाडी गावातील महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे .
एकीकडे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असणारा माळशेज घाट आणि घाटाच्या खाली असणाऱ्या आदिवासी भागातील खेडोपाडी महिलांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामपंचायत निधीतून बांधण्यात आलेल्या दोन पाइपलाइन असून तरी देखील या गावात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाईपलाईन तयार करून गावामधे नळ देखील बसविण्यातआले असून परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की नळाला पाणी मात्र आलेलं नाही. प्राथमिक माहिती अशी मिळते की 7लाख रुपये निधी येऊन देखील अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. या आदिवासी गावाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने येथिल महिलांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांच्यावर खूप अन्याय होत आहे त्यामुळे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्यांच्यावर होणारा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. आणि त्यांचे जे हक्क आहेत ते त्यांना मिळाले पाहिजेत. आमच्या कडे कोणीही अधिकारी लक्ष देत नसल्याने आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. तरी मुख्यमंत्री साहेब तुम्ही तरी आमच्या कडे लक्ष द्या अस वक्तव्य स्थानिक महिलांनी केलंय