५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
टिटवाळा:- वैकुंठवासी आतिश हनुमान पाटील यांच्या ५ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यतिथी कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार व नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत ह.भ.प.श्री दशरथ महाराज केणे यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता गावदेवी भजन मंडळाचे भजन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम लायन आतिश शेट निवास, जुन्या पोस्ट ऑफिसजवळ,सांगोडे रोड,टिटवाळा (पश्चिम),मांडा येथे आयोजित करण्यात आला असून,समस्त पाटील परिवार,कोळीवाडा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्री.रुपेश शेट हनुमान पाटील यांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी,असे आवाहन केले आहे.