• Total Visitor ( 702068 )
News photo

वेंगुर्ला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला केळूस मध्ये जोरदार धक्का

Raju Tapal publisher May 15, 2026 59

वेंगुर्ला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला केळूस मध्ये जोरदार धक्का



केळूसचे सरपंच योगेश शेट्ये यांनी दिला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘सभासद प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा



भाजप की शिवसेना शिदे पक्षात जाणार? 



की राजकारणातून संन्यास घेणार? याकडे लागले केळूस गावचे लक्ष 



वेंगुर्ले:- वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केळूस गावामध्ये जोरदार धक्का बसला आहे. पक्षाचे निष्ठावंत सभासद असलेले केळूस गावचे सरपंच योगेश शेटये यांनी अचानक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सभासद' पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.हा राजीनामा त्यांनी शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यांच्याकडे दिल्याचे शेट्ये यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. योगेश शेटये यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात असे म्हटले आहे की,मी,योगेश कृष्णा शेटये,मु. केळूस,ता. वेंगुर्ला,या पत्राद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माझ्या 'सभासद' पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026