सायत येथे प्रभागस्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव
दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२४ ला आयोजन
आसरा,भातकुली,गणोरी केंन्द्रातील खेळाडू विद्यार्थी सहभागी
भातकुली दि.१९-पंचायत समिती भातकुली अंतर्गत भातकुली परिक्षेत्रातील जि.प.प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन दि.२३ व २४ डिसेंबर, २०२४ या कालावधीत सायत येथिल संत गाडगेबाबा विद्यालय येथे संपन्न होत आहे. या महोत्सवात सहभागी बाल खेळाडुंचे कौतुक कवण्याकरीता व त्यांना प्रोत्साहीत करण्याकरीता क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या क्रीडा महोत्सवात आसरा,भातकुली आणि गणोरी केंन्द्रातील खेळाडू विद्यार्थी सहभागी होणार आहे.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन समारंभ सोमवार, दि.२३ डिसेंबर, २०२४ सकाळी ११ वा.उद्घाटक अमर राऊत,गटविकास अधिकारी (भाप्रसे) पंचायत समिती,भातकुली हे राहणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सायतच्या सरपंच सौ.अन्नपूर्णा मानकर तर विशेष अतिथी उपसरपंच विशालभाऊ भट्टड, मंगेशभाऊ मोहोड अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सायत,सह.गटविकास अधिकारी प्रविण वानखडे, दिपक कोकतरे गटशिक्षणाधिकारी,प.स.भातकुली,शा.पो.आहार अधिक्षक नरेन्द्र गायकवाड,प्रमुख अतिथी संतोष घुगे,शिक्षण विस्तार अधिकारी, पं स भातकुली पंजाबराव पवार,शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स भातकुली, शकील अहमद खाँ शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.भातकुली
पुष्पा रामावत मुख्याध्यापिका, संत गाडगेबाबा विद्यालय,सायत हे राहणार आहे.
बक्षिस वितरण व समारोप समारंभ मंगळवार दि. २४ डिसेंबर,२०२४ दुपारी २ वा.
बक्षिस वितरक विशालभाऊ भट्टड उपसरपंच, ग्राम पंचायत,सायत यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक कोकतरे गटशिक्षणाधिकारी,पं.स. भातकुली,प्रमुख अतिथी
मंगेशभाऊ मोहोड अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, सायत मा. नुजरत अफरोज नासिर शहा उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,सायत हे राहणार आहे. क्रीडा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
किशोर रूपनारायण केंद्रप्रमुख,आसरा, निता सोमवंशी,केंद्रप्रमुख गणोरी,शैलेंद्र स.दहातोंडे केंद्रप्रमुख भातकुली,सौ. रंजना पुनकर, मुख्याध्यापिका, जि.प. प्राथ शाळा,सायत,तथा समस्त शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व मुख्याध्यापक, विषय साधन व्यक्ती, फिरते विशेष शिक्षक व सर्व शिक्षक वृंद केंद्र आसरा, गणोरी, भातकुली तथा सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी पं.स.भातकुली यांनी केले आहे असे क्रीडा महोत्सवाचे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
क्रीडा महोत्सवा मध्ये प्राथमिक विभाग सांघिक खेळ कबड्डी,खो-खो वैयक्तिक खेळ मध्ये लंगडी,७५मी.धावणे,लांब व उंच उडी,दोरीवरील उड्या याचा समावेश असुन माध्यमिक विभाग सांघिक खेळकबड्डी,खो-खो,व्हाॅलीबाॅल,टेनिक्वाइड,दुहेरी,बॅडमिंटनदुहेरी,१००x४रिले,वैयक्तीक खेळ मध्ये १००मी.धावणे,लांब व उंच उडी,कुस्ती,गोळा फेक,टेनिक्वाइड मुली याचा समावेश आहे.