• Total Visitor ( 516092 )
News photo

कल्याणात १७ मे रोजी ‘शून्य सावली दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन

Raju Tapal publisher May 17, 2026 19

कल्याणात १७ मे रोजी ‘शून्य सावली दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन



कल्याण:-आकाश मित्र मंडळ,कल्याण आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार,१७ मे रोजी ‘शून्य सावली दिवस’ या विशेष खगोलशास्त्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम दुपारी ११.४५ वाजता सुभाष मैदान,अत्रे रंगमंदिर मागे,कल्याण येथे होणार आहे.या कार्यक्रमात नागरिकांना सूर्याच्या विशिष्ट स्थितीमुळे वस्तूंची सावली काही क्षणांसाठी पूर्णपणे नाहीशी कशी होते,याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.कार्यक्रमात ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ व लेखक हेमंत मोने मार्गदर्शन करणार असून खगोलप्रेमी व लेखक अर्चित गोखले तसेच विद्येश कुलकर्णी यांचीही उपस्थिती राहणार आहे. शून्य सावली दिवसाचे वैज्ञानिक महत्त्व,त्यामागील खगोलशास्त्रीय कारणे आणि दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.खगोलशास्त्राची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क संजय पांडे -9819288680


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement