जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रिडा महोत्सव
अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात
३० जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत आयोजन
१४ तालुका संघ,मुख्यालय,अधिकारी वर्ग १६ संघाचा राहणार सहभाग
जिल्हातील तिन हजार अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार
अमरावती,ता.२८ :- दैनदिन सततच्या कामाचा ताणतनाव कमी व्हावा या करीता दरवर्षी अमरावती जिल्हा परिषदअधिकारी व कर्मचारी क्रिडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या वर्षाला विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत संपन्न होणार आहे. जिल्हातील तिन हजार अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार आहे.सांघिक व वैयक्तीक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे,
या चार दिवसीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन गुरुवारला (ता.३०) सकाळी १० वाजता आहे.
उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्र ह्या राहतील.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,जिल्हा पोलिस अधीक्षक, विशाल आनंद, महानगर पालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे,
सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत,मिन्नू पी एम.जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस उपस्थित राहणार आहे.तसेच डी.आर.डी.ए.च्या प्रकल्प संचालक,प्रिती देशमुख,मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अश्विनी मारणे,समाज कल्याण अधिकारी ज्ञानोबा पुंड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, डॉ पुरुषोत्तम सोंळके,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेश आसोले जिल्हा आरोग्य अधिकारी,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड,कृषि विकास अधिकारी मलप्पा तोडकर, पावस्व विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी
संजय खारकर, नारेगाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी प्रतीक चन्नावार,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.अरविंद मोहरे हे सुद्धा पाहुणे म्हणून राहतील.अशी माहीती क्रिडा महोत्सवाचे सचिव क्रिडा संयोजक डाॅ.नितिन उंडे यांनी दिली. या चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचा समारोप फेब्रुवारी रोजी होणार आहे. असे क्रिडा महोत्सवाचे प्रसिध्दी समितीचे विनायक लकडे,शकील अहमद,राजेश सावरकर, श्रीनाथ वानखडे यांनी कळविले आहे.
लीबॉल पासींग,व्हॉलीबॉल स्ट्रोक्स,फुटबॉल,बॅडमिंटन एकेरी,बॅडमिंटन दुहेरी,बॅडमिंटन एकेरी ४५ वर्षावरील,बॅडमिंटन दुहेरी ४५ वर्षावरील,टेबल टेनिस एकेरी,टेबल टेनिस दुहेरी,टेनिक्वॉईट एकेरी,टेनिक्वॉईट दुहेरी,कॅरम एकेरी,कॅरम दुहेरी तसेच १०० मिटर धावणे,थाळी फेक,गोळा फेक,भाला फेक,१०० मिटर धावणे,२०० मिटर धावणे,४०० मिटर धावणे,१५०० मिटर धावणे,१०० मिटर धावणे ४५ वर्षावरील,१०० मिटर धावणे ४५ वर्षावरील,रिले रेस ४-१००,लांब उडी,उंच उडी,थाळी फेक,गोळा फेक,भाला फेक,स्विमिंग ५० मी,स्विमिंग १०० मी,स्विमिंग ५० मी (४५ वर्षावरील),स्विमिंग १०० मी (४५ वर्षावरील) व बुद्धिबळ यात महिला व पुरुष अधिकारी,कर्मचारी सहभागी होणार आहे.
३० जानेवारीला एक दिवस संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कतिक कार्यक्रमामध्ये भक्तीगीत,भावगीत,लोकगीत,सिनेगीत,हास्यजत्रा,समूहनृत्य,कारओके
एकल नृत्य व आदींचा समावेश आहे.यात अंजनगाव सुर्जी,मोर्शी,अधिकारी वर्ग,चांदुर रेल्वे,दर्यापूर, चिखलदरा,धामणगाव रेल्वे,नांदगाव खंडेश्वर, तिवसा,भातकुली,धारणी,अचलपूर,मुख्यालय,अमरावती,चांदुर बाजार,वरुड या पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचारी आपल्या कलेचा आविष्कार सादर करणार आहे.