टिटवाळ्यात तीन दिवसांपासून बेवारस माणूस रस्त्यावर
राजू टपाल.
टिटवाळा :- टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या पार्किंग परिसरात गेल्या तीन दिवसांपासून एक इसम रस्त्यावरच पडलेला आहे. त्याची अवस्था अत्यंत बिकट असून, तो व्यक्ती जागेवरून हलू शकत नाही, तरीही त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही, ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. मात्र तरीही मदतीची वाट पाहत असलेली ती व्यक्ती आज तिसऱ्या दिवशीही त्याच ठिकाणी आहे.
112 या आपत्कालीन क्रमांकावर देखील नागरिकांनी संपर्क साधून ही माहिती दिली होती. त्यानंतर संबंधित पोलीस स्थानकातून एक पोलीस कर्मचारी म्हणाला की, घटनास्थळी 112 मार्फत पाठवलेल्या पथकाने पाहणी केली आहे. पण त्यानंतरही प्रत्यक्षात काहीही कार्यवाही झाली नसल्याचे स्थानिकांनी पुन्हा कळवले.
मात्र या इसमाजवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, तो व्यक्ती फक्त नशेत नसून त्याच्या पायाला जबर मार लागलेला आहे, त्यामुळे त्याला हलता येत नाही, हे समोर आले. त्याचबरोबर त्याने स्वतः सांगितले की तो भायखळा परिसरातील आहे. सदरील व्यक्ती जखमी असून
प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
काही दिवसांपासून कल्याण तालुक्यात एमडी ड्रग्स प्रकरणांत वाढ झालेली आहे, त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक संशयास्पद घटनेची गंभीरतेने दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीचा जीव गेला, तर त्यासाठी दोषी कुणाला ठरवणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.