• Total Visitor ( 600317 )
News photo

वर्षानुवर्षांचा अडसर हटला;मुंबई मार्गाला दिलासा!

Raju Tapal publisher June 19, 2026 47

वर्षानुवर्षांचा अडसर हटला;मुंबई मार्गाला दिलासा!



कोपरी वाहतूक शाखेच्या पाठपुराव्याला यश;आनंदनगरजवळील नाल्यावर काँक्रीट स्लॅब,वाहतुकीला मिळणार वेग



ठाणे :- मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी कोपरी वाहतूक शाखेने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आनंदनगर पोलीस चौकीजवळील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ब्रिटिशकालीन नाल्यावर मुंबई महापालिकेने (BMC)  काँक्रीट स्लॅब टाकला असून,जुनी ऑक्ट्रॉय भिंतही हटविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे. हरिओमनगर जंक्शन,शिवराज हॉटेल आणि आनंदनगर परिसर हा मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र,या ठिकाणी असलेल्या जुन्या नाल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत होती. परिणामी सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असे. अनेकदा कोंडीचा परिणाम द्रुतगती मार्गावरही जाणवत होता. वाहनचालकांचा वेळ वाया जाण्यासोबतच इंधनाचा अपव्यय आणि प्रदूषणातही वाढ होत होती. या समस्येची गंभीर दखल घेत कोपरी वाहतूक शाखेने वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेशी सातत्याने समन्वय साधला. त्यानुसार वाहतूक अभ्यास, प्रत्यक्ष पाहणी आणि तांत्रिक बाबींचा विचार करून या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नाल्यावर मुंबई महापालिकेने मजबूत काँक्रीट स्लॅब टाकून रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. याशिवाय,टेलिफोन बॉक्स,रस्त्यालगतची जुनी ऑक्ट्रॉय भिंत हटविण्यात आल्याने अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वाहनांना अधिक सहजपणे मार्गक्रमण करता येणार असून, वाहतुकीचा प्रवाह अखंड ठेवण्यास मदत होणार आहे. विशेषतःमुंबईकडे कामानिमित्त जाणाऱ्या हजारो नागरिकांना या बदलाचा मोठा फायदा होतो आहे. मुंबई महापालिका आणि वाहतूक शाखेच्या समन्वयातून हा अडथळा दूर झाला. विविध यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविता येतात. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून शिस्तबद्ध वाहतुकीस सहकार्य करावे.



 दिलीप पाटील  (वरिष्ठ पोलिस निरीक्षक,कोपरी वाहतूक विभाग)



ठिकाणी दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. आता रस्ता रुंद झाल्याने प्रवास अधिक सुरळीत होईल आणि वेळेचीही मोठी बचत होईल.



विजय साळुंखे (वाहन चालक,ठाणे)


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement