• Total Visitor ( 600314 )
News photo

४७ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग;जुन्या आठवणींना उजाळा

Raju Tapal publisher June 18, 2026 56

४७ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग;जुन्या आठवणींना उजाळा

     

पुणे :- लोणीकंद (ता. हवेली) येथील डॉ. बसू हायस्कूलच्या १९७९-८० च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा तब्बल ४७ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सर्वांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आनंदाचा दिवस अनुभवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळापूर नगरीत हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील चांगले-वाईट अनुभव,संघर्ष आणि यशोगाथा एकमेकांसमोर मांडल्या. अनेक वर्षांनंतर भेट झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावनिक क्षण पाहायला मिळाले.

या प्रसंगी दिवंगत मित्र कै. गणपत पंढरीनाथ झुरुंगे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. मेळाव्यास शाम पटेकर,राजेंद्र झुरुंगे,मारुती भूमकर,योगीराज मोरे,नारायण तळेकर,रमेश वाळुंज, ज्ञानेश्वर यशवंत,नानासाहेब आबनावे,दत्तात्रय कंद,कुंडलिक झुरुंगे,सुदाम मगर,रामदास कोलते,उद्धव भूमकर,भरत शिंदे,संपत कंद, अरुण लोखंडे,चंद्रकांत भुसे,अशोक लोखंडे,बाळासाहेब कंद आदी उपस्थित होते. या स्नेहमेळाव्याचे आयोजन धनश्याम पटेकर व मारुती भूमकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement