आचरा बाजारात साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी
Raju tapal
October 17, 2024
16
आचरा बाजारात साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी
दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांचा प्रताप
आचरा :- सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन इसमांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना आज बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात घडली.
सोने खरेदी करण्याचा बहाणा करत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यानी काउंटरवरील ठेवलेला सोन्याच्या दागिन्याचा पाऊच लांपास केला.काउंटरवर असलेला पाऊच गायब झाला असल्याचे दुकान मालक अरुण कारेकर यांच्या काहीवेळाने लक्षात येताच बाजूच्या व्यापाऱ्यांना सांगत पोलीसांना त्यांनी खबर दिली .सदर अज्ञात चोरटे आचरा बाजारातील काही दुकानाच्या व आचरा तिठा येतील रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आहेत. सदर घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम आचरा पोलीस ठाण्यात चालू होते.
आचरा बाजारपेठ येथील अरुण गणेश कारेकर यांच्या साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात सायंकाळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले यावेळी दुकान मालक कारेकर यांनी त्याना काही दागिने दाखवले परंतु दागिने पसंत नसल्याचे सांगत दुकानातुन गोल 30 रुपयाचा तावीज खरेदी केला व लागलीच दुचाकीवर आचरा तिथ्याच्या दिशेने निघून गेलेत कारेकर हे दाखवलेले दागिने पुन्हा आत ठेवत असताना काउंटरवर असलेला सोन्याचे 8 मणी, सोन्याची 12 डावली, सोन्याचे 1 पेंडल असे 20 ग्राम वाजणाचे दागिने असलेला पाऊच गायब असल्याचे लक्षात आले सुमारे सवादोन लाख रुपयाचे दागिने असल्याची माहिती कारेकर यांनी दिली.
आचरा बाजारपेठेत दागिने लांपास करून दुचाकीवरून निघून गेलेले अज्ञात दोन इसम हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत आचरा पोलिसाचे आचरा तिठ्यावर असलेल्या कॅमेऱ्यात हे अज्ञात चोरटे कणकवली वरून आचरापेठेत दिसून आले आहेत तसेच आचरा बाजारपेठेतील एका भुसारी दुकानात चढून काही वस्तू खरेदी करताना हे चोरटे त्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आले त्यानंतर ते कारेकर यांच्या दुकानात प्रवेश करताना दिसून आलेत. कारेकर यांच्या दुकानातून बाहेर पडत हे चोरटे मालवणच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही त दोन्ही इसम स्पष्ट दिसत असून निळ्या रंगाची होंडाकंपनीची एस पी शाईन दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भर दिवसा रहदारी असलेल्या बाजारपेठेतील ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी हात मारत चोरी केल्यामुळे व्यापारयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
Share This