• Total Visitor ( 581258 )
News photo

यश इन चौकाजवळ अपघात ; ७ जण जखमी

Raju tapal October 15, 2025 82

यश इन चौकाजवळ अपघात ; ७ जण जखमी

       

शिक्रापूर (प्रतिनिधी):- कारेगाव पासून पुण्याच्या दिशेने १ कि.मी. अंतरावरील यश इन चौकाजवळ रविवारी रात्री झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाले. अपघातात ४ वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याचे समजते.

पुरूषोत्तम भागवत काठुळे वय -२४, अभिषेक राजेंद्र पवार वय -२२,संधी परमेश्वर मस्के वय -१९,किशोर वसंत राठोड कुमारी आरती किशोर राठोड,सुमित बबन मगर ,नितीन कमलेश चौधरी रा.सर्वजण कारेगाव‌ ता.शिरूर अशी जखमींची नावे आहेत. हेमंत इनामे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ व्ही क्यू २१८८ या क्रमांकाची किया कार घेऊन नगरहून पुण्याकडे जात होते.रात्री १० वाजण्याच्या सुमारास कारेगाव‌ जवळील यश इन चौकाजवळ भरधाव वेगात वाहन चालवत पियागो रिक्षा क्रमांक एम एच १२ क्यू ई‌ ३७५८ ला जोरदार धडक दिली.या धडकेत रिक्षा जवळ उभे असलेले ७ जण जखमी झाले.या अपघातात रिक्षा,दोन दुचाकी, तसेच किया कार अशा चार वाहनांचे नुकसान झाले. रिक्षाचालक अनिल भागवत काठुळे वय -२५ रा‌.कारेगाव यांनी या अपघाताची तक्रार रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये दिली असून पोलिस उपनिरीक्षक चव्हाण या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement