दिवेआगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी बंद....
८ दुर्दैवी विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार
आळंदी पंचक्रोशी परिसर शोकाकुल
आळंदी ( गौतम पाटोळे) :रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आलेली भरती आणि पाण्याचे उंचीचा अंदाज न आल्याने आळंदी तील विनर्स अकॅडमी या खाजगी क्लासचे आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या दुर्दैवी दुर्घटने मुळे आळंदी देवाची, केळगाव, चऱ्होली खुर्द मध्ये नागरिक,व्यापारी यांच्या आस्थापना,दुकानदार यांनी स्वयसफूर्तीने परिसर बंद ठेवला होता.या बंद मधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आली. या वेळी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
आळंदीतील चावडी चौक,मंदिर परिसर,भराव रस्ता, नगरपरिषद व्यापारी संकुले, महाद्वार चौक,बाजारपेठ,वडगाव रस्ता,मरकळ रोड,प्रदक्षिणा मार्ग,शिवतेज चौक,इंद्रायणी नदी घाट,चाकण रस्ता चौक आदी ठिकाणांसह पंचक्रोशी मध्ये व्यापारी,व्यावसायिक,संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद करून,बंद ठेवून शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभाग नोंदवत बंद मध्ये सहभागी झाले.
नातेवाईकांची आळंदी पोलीस ठाण्यासह क्लास चे परिसरात गर्दी करून घटनेची माहिती घेत होते.रात्री पासून विनर्स अकॅडमी येथे आणि पहाटे आळंदी पोलीस ठाण्याचे परिसरात सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक,ग्रामस्थ यांनी गर्दी केली.पहाटे उर्वरित मुले सुरक्षित प्रवास करून आपापल्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आली. दिवेआगर येथून गुरुवारी रात्री उशिरा निघालेली सहलीची बस शुक्रवारी सकाळी आळंदीत आली.बस दाखल होताच आणि विद्यार्थ्यांचे मृतदेह एकापाठोपाठ एक आळंदीत आणले जात असताना उपस्थित सर्वांनी हळहळ व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना अनेकांचे अश्रू अनावर झाले.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
केळगाव व आळंदी परिसरात सकाळी रुग्णवाहिकांमधून मयत विद्यार्थ्यांचे मृतदेह आले. यातील केळगाव येथील २ आणि आळंदी येथील ४ अशा एकूण ६ आणि अमरावती येथील एक ,श्रीरामपूर येथील एक विद्यार्थ्यांवर त्यांचे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी आळंदी आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. निष्पाप ८ मुलांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण आळंदी परिसर धोकाकुल होता.
आळंदी पंचक्रोशीत बंद पाळून श्रद्धांजली अर्पण
दिवेआगार येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी झालेल्या विद्यार्थ्यांचे अंत्यविधी शोकाकुल वातावरणात करण्यात आले. यामध्ये चार विद्यार्थ्यांचे अंत्यविधी आळंदी येथे झाले. तसेच दोन विद्यार्थ्यांचे अंत्यविधी केळगाव येथे तर अमरावती आणि श्रीरामपूर येथे दोघांचे अंत्यविधी अत्यंत शोकाकुल भावपूर्ण वातावरणात झाले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्दैवी घटनेमुळे आळंदी पंचक्रोशीवर शोककळा पसरली होती. आळंदी,केळगाव आणि चऱ्होली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने बंद पाळून विद्यार्थ्याना शोकाकुल वातावरणात विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.आळंदी, केळगाव,चऱ्होली खुर्द मध्ये विविध आस्थापनांनी, विविध संस्था,व्यक्ती,पदाधिकारी यांनी बंद मध्ये सहभाग घेत श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कार ठिकाणा मध्ये
आळंदी येथील स्मशानभूमीत
सुमित भरत अहिरे,तन्मय दत्तात्रय वहिले, प्रणव रामदास बनसोडे,कैवल्य सतीश वासनकर यांचे,केळगाव येथे सोहम तुकाराम भांडवलकर,राजवीर युवराज वहिले तसेच यश किरण वानखेडे(अमरावती )येथे आणि कौस्तुभ संदीप दौंड (श्रीरामपूर) यांचे अंत्यसंस्कार गावी शोकाकुल वातावरणात झाले.