• Total Visitor ( 542283 )
News photo

निरागस मने पुस्तकासाठी लेखिका मिना म्हसे सन्मानित

Raju Tapal publisher May 26, 2026 20

निरागस मने पुस्तकासाठी लेखिका मिना म्हसे सन्मानित



शिरूर:- बारामती येथे भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेखिका मिना म्हसे यांचा सन्मान निवृत्त शिक्षण संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांच्या हस्ते अभिषेक पॅलेस बारामती येथे करण्यात आला. भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिक व अन्य प्रतिभावंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निमंत्रित कवींचे कविसंमेलन घेण्यात आले. सोमनाथ सुतार,अलका रसाळ आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

यावेळी संभाजी नाना होळकर,ज्येष्ठ लेखिका डॉ.प्रतिमा इंगोले,मोगल जाधव,संतोष पवार,बबन पोतदार,अजित काटकर,निलेश गवळी, संजय जाधव,माधव जोशी वनिता जाधव,किरण आळंदीकर,मेनकाताई मगर,आशादेवी वायाळ,सचिन ठोंबरे आणि सागर वायाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांचे साहित्यिक क्षेत्रातील काम उत्कृष्ट आहे. पाठ्यपुस्तकातील साहित्यिक व प्रतिभावंतांचा सन्मान केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते व भविष्यात अशाच प्रकारच्या प्रेरणादाक कामाची अपेक्षा व्यक्त करते अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका मिना अशोक म्हसे यांनी व्यक्त केली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement