• Total Visitor ( 84383 )

भटके विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी भाजपा कटिबद्ध - माजी आमदार नरेंद्र पवार*

Raju Tapal November 22, 2021 76

भटके विमुक्त समाज हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा मुख्य घटक आहे, राज्याच्या वेगवेगळ्या भागात विखुरला गेलेला समाज हा विकासाच्या कोसोमैल दूर आहे, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, समाज समृद्ध करायचा असेल तर त्यांना संघटित करून प्रगतीच्या वाटेवर आणले पाहिजे, भाजपा विकासासाठी कटिबद्ध आहे असे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

 

नुकतीच भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची मुंबईची कार्यकारिणी जाहीर केली. दरम्यान त्या कार्यक्रमात नरेंद्र पवार बोलत होते.

भाजपा भटके विमुक्त आघाडी मुंबई अध्यक्षपदी आनंद कुऱ्हाडे यांची निवड केली. 

भाजपा केवळ आश्वासन नाही तर काम करणारी पार्टी आहे, येणाऱ्या काळामध्ये भटके विमुक्त समाजाला एकत्र आणणार आहे, त्यांचे प्रश्न समजून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहे, पक्षाची बांधणी, संघटन व भटके विमुक्त आघाडीच्या बुथस्तरापर्यंत काम करण्याचे आवाहन नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.

 

यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष तथा भटके विमुक्त आघाडी प्रभारी डॉ.शिरीष जाधव, भ.वि.आघाडी सहसंयोजक श्री.रवीजी कुंचीकर्वे, मुंबई सचिव श्री. प्रतिक करपे, शिक्षक आघाडी मुंबई अध्यक्ष श्री. राजू बंडगर, भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.रश्मीताई जाधव आदि. मान्यवर पदाधिकारी, भटके विमुक्त आघाडीचे ज़िल्हा अध्यक्ष, पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष उपस्थित होते.

Share This

titwala-news

Advertisement