कोंढापुरी येथे ढगाळ वातावरण
शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज शुक्रवार दि.९ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
कोंढापुरी परिसरात कांदा काढणीची कामे तसेच काढून ठेवलेल्या कांद्याच्या पिशव्या भरण्याची कामे शेतक-यांकडून चालू झालेली असल्याने अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.
हवामान विभागाने येत्या ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली असून अवकाळी पावसासह गारपिटीचाही अंदाज व्यक्त केला आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यातील बीड,परभणी, हिंगोली,लातुर,जालना याठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तर छत्रपती संभाजीनगर येथे हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील वाशिम, नागपूर, अकोला, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा येथे आगामी चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथेही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे,पालघर येथेही पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश येथेही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)