कल्याणमध्ये ‘रांगोळी महोत्सवा’चा रंगतदार उत्सव!
विविधांगी रांगोळ्यांचे आविष्कार दिवाळीच्या सणामध्ये रंग भरण्याचे काम करतात. रंगोळीची ही कला आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही टिकून रहावी, नवीन पिढीला या कलेची महती कळावी, या उद्देशाने कल्याणच्या सुभेदारवाडा कट्टा यंदा ‘रांगोळी महोत्सवा’चे आयोजन करत आहे. या महोत्सवात रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात येणार असून,महिला,मुलींसह कलाकारांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. हा महोत्सव शनिवार,१८ ऑक्टोबर ते सोमवार,२० ऑक्टोबर २०२५ दरम्यान सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत शारदा विद्यामंदिर,लालचौकी,कल्याण (प.) येथे होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी शनिवार,१८ ऑक्टोबरला दुपारी ३ ते ६ या वेळेतच रांगोळी काढून पूर्ण करायची आहे. रांगोळी, रंग आणि साहित्य स्वतः आणायचे आहेत. रांगोळी स्वतःच्या हातानेच काढायची आहे. कोणत्याही ठशाचा किंवा छायेचा वापर स्पर्धकाला करता येणार नाही. रांगोळीचे क्षेत्रफळ ४ बाय ४ चौरस फूट असणार आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, तर सर्व सहभागींनाही प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, असे आयोजकांनी केळविले आहे.
नाव नोंदणीसाठी व अधिक माहिती संपर्कासाठी :
यश महाजन : 9930571257
अर्जुन पाटील : 982059497