• Total Visitor ( 702617 )
News photo

पुणे राष्ट्रभक्ती परिवारातर्फे नंदकुमार वडगावकर यांना समाजसेवा पुरस्कार

Raju Tapal publisher June 25, 2026 66

पुणे राष्ट्रभक्ती परिवारातर्फे नंदकुमार वडगावकर यांना समाजसेवा पुरस्कार



फुलगाव (गौतम पाटोळे):- आळंदी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आळंदी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत पुणे राष्ट्रभक्ती परिवाराच्या वतीने समाजसेवा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. आळंदी देवाची येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वडगावकर यांना संस्थेच्या वतीने सन्मानपत्र,राष्ट्रभक्तीची तिरंगी शाल आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बिग बॉस मराठी फेम अभिनेते अभिजीत बिचुकले,संस्थेचे सुनील गोरे तसेच प्रसिद्ध सायकलपटू बेलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात कला,क्रीडा,साहित्य,रुग्णसेवा,वृक्षारोपण,अंधसेवा,रक्तदान,कुस्ती आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले. नंदकुमार वडगावकर यांच्या या सन्मानाबद्दल आळंदी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली ही गौरवाची पावती असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026