• Total Visitor ( 653690 )
News photo

बाबुरावनगर येथून खाद्यतेलाचे डबे लंपास

Raju Tapal publisher August 02, 2026 44

बाबुरावनगर येथून खाद्यतेलाचे डबे लंपास 

         

शिरूर (प्रतिनिधी:- विजय ढमढेरे):- मालवाहू टेम्पोचे  लाॅक तोडून १ लाख ८४ हजार किंमतीचे तेलाचे डबे लंपास करण्याची घटना शिरूर जवळील बाबूरावनगर येथे घडली. याबाबत समजलेल्या माहितीनूसार,शिरूर जवळील बाबूरावनगर येथे स्वप्नील सूर्यकांत सुराणा यांचे श्रेयांश ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा मालाचे दुकान असून त्यांनी २९ जुलै २०२६ रोजी रात्री १० वाजता दुकानाजवळ उभ्या असलेल्या अशोक लेलॅण्ड एम एच १२ क्यू डब्ल्यू ३६१३ क्रमांकाच्या टेम्पो मध्ये सोयाबीन,सूर्यफूल गोडेतेलाचे डबे भरून ठेवले होते‌.अज्ञात चोरट्याने टेम्पो चे लाॅक तोडून टेम्पो मध्ये ठेवलेले १४ लिटरचे‌ ४० डबे,८८ हजार रूपये किंमतीचे सोयाबीन तेल,९६ हजार रूपये किंमतीचे सूर्यफूल तेलाचे डबे चोरून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्वप्नील सूर्यकांत सुराणा वय ४४ रा‌.बाबूरावनगर,शिरूर यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. हवालदार विशाल कोथळकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement