• Total Visitor ( 700797 )
News photo

इस्रायलचा सीरियावर भीषण हल्ला

Raju tapal July 17, 2025 92

इस्रायलचा सीरियावर भीषण हल्ला;

संरक्षण मंत्रालयासह लष्कराचं मुख्यालय उडवलं;

तर घाबरलेली महिला अँकर लाईव्ह कार्यक्रम सोडून पळाली 



जेरूसलेम :- इस्रायलने सीरियावर भीषण हल्ला केला असून संरक्षण मंत्रालयासह थेट लष्कराच मुख्यालय उडवलं आहे. हल्ल्याच्या वेळी सर्वत्र प्रचंड धुराचे लोट दिसत होते. इस्रायली सैन्याने दमास्कस शहरावर हल्ला केला, तेव्हा एका टीव्ही चॅनेलवर एक लाईव्ह कार्यक्रम सुरू होता. हल्ल्याचा परिणाम इतका जोरदार होता की एक महिला अँकर टीव्ही चॅनेलवर बातम्या सांगत होती, मात्र हल्ल्यामुळे तिला लाईव्ह कार्यक्रम सोडून पळून जावे लागले.



इस्रायलने म्हटले आहे की जर सीरियाच्या सरकारी सैन्याने दक्षिण सीरियातील ड्रुझ समुदायावर हल्ला सुरू ठेवला, तर इस्रायल सिरियाचा नाश करेल. सोमवारी, ड्रुझ लढवय्ये आणि बेदौइन जमातींच्या सशस्त्र पुरुषांमधील लढाई थांबवण्यासाठी सीरियाच्या सरकारने स्वेदा शहरात आपले सैन्य पाठवले. परंतु नंतर सीरियाच्या सैन्याची स्वतः ड्रुझ लढवय्यांशी चकमक झाली. त्यानंतर सिरियावर केलेल्या हल्ल्यात सर्वत्र हलकल्लोळ माजला. सीरियावरील हल्ल्याची माहिती देताना इस्रायल डिफेन्स फोर्सने X वर म्हटले की, आम्ही सीरियाच्या दमास्कस प्रदेशातील सीरियाच्या लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला केला आहे.



सध्या आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. इस्रायली सरकारच्या निर्देशानंतर हा हल्ला केल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. आता सीरिया ड्रुझ समुदायाबाबत काय निर्णय घेणार यावर इस्लायलचे बारीक लक्ष आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सीरियाच्या दक्षिण स्वैदा भागात गेल्या काही दिवसांपासून हिंसक चकमकी सुरु आहेत. सीरियन सुरक्षा दल आणि ड्रुझ मिलिशिया गटात युद्धबंदीचा निर्णय झाला होता, मात्र नंतर युद्धबंदीचे उल्लंघन झाले, त्यानंतर सीरियन लष्कराने स्वैदा प्रांतात कारवाई केली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संघर्ष पुन्हा सुरु झाला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026