• Total Visitor ( 430911 )
News photo

फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं

Raju tapal April 10, 2025 93

फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं;कर्जतमध्ये शरद पवार गटाच्या सत्तेला सुरुंग लावताच रोहित पवार राम शिंदेंवर कडाडले



Rohit Pawar on Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी कर्जत नगरपंचायतीत शरद पवार गटाच्या सत्तेला सुरुंग लावलाय.यानंतर आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंवर तोफ डागली.



Rohit Pawar on Ram Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना कर्जतमध्ये भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी मोठा धक्का दिला. कर्जत नगरपंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गट,  काँग्रेस आणि भाजपच्या 13 नगरसेवकांनी रोहित पवारांच्या समर्थक असलेल्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर बंडखोर नगरसेवकांनी राम शिंदे यांची भेट घेतली. राम शिंदे यांनी बंडखोर नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेत रोहित पवारांवर टीका केली. त्यानंतर आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. 



रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलंय की, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती ही घटनात्मक पदं असून महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मानसन्मान आहे. कारण या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला. पण, अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय? अशी शंका येते. 



फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं



विधानपरिषदेच्या सभापती महोदयांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं. वास्तविक प्रथा परंपरा, निष्ठा, विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही, त्यामुळं कर्जत-जामखेडने पैशांपेक्षा प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार कायमच जपला. पण आज..? एक मात्र बरं झालं, यानिमित्ताने फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं. आता अपेक्षा एकच आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी, असे म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement