जिलेटीनसदृश लिक्विडचा वापर करून एटीएम मशिन फोडले ; १६ लाख लंपास
जिलेटीनसदृश लिक्विडचा वापर करून चोरट्यांनी खेड तालुक्यातील चिंबळी येथील एटीम मशिन फोडून १६ लाख ५१ हजार रूपये लांबविल्याची घटना रविवारी दि.२६/१२/२०२१ रोजी घडली.
चिंबळी ता.खेड येथे ऍक्सिस बँकेच्या एटीएम केंद्रात रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी जिलेटीन सदृश लिक्विडचा वापर करून स्फोट केला. या स्फोटात एटीएम मशीनमधील १६ लाख ५१ हजार रूपयांची रोकड घेवून चोरट्यांनी पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांचा मोठा ताफा तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.
एटीएम केंद्रातील सी सी टी व्ही कॅमे-यावर एका चोरट्याने काळा स्प्रे फवारला. या घटनेत दोन तीन चोरट्यांचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांकडून व्यकँत केला जात आहे.
बँकेच्या एटीएम मध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली नव्हती. याबाबत बँकेला नोटीस पाठविण्यात आली होती.
चोरट्यांनी कशाच्या साहाय्याने स्फोट केला याचा शोध घेण्यात येत असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे रमेश पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.