कल्याणच्या छम छम मध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांचा धिंगाणा
रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा जणांनी गोंधळ घातला यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ताल बार मध्ये काल रात्री दहा वाजन्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.