कुडाळ पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी
कुडाळ तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या चोरटयाला अखेर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या पोलीस टीमने केले गजाआड..
तर आरोपी रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी रा. आकेरी, घाडीवाडी ता.कुडाळ याच्याकडून चोरीला गेलेला एकूण 3 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज केला कुडाळ पोलिसांनी हस्तगत.
पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.
सिंधुदुर्ग :- कुडाळ पिंगुळी, काळेपाणी, झाराप व साळगांव येथे झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्हयाची आकेरी येथील संशयित रामचंद्र उर्फ अभय घाडी याने कबुली दिली आहे.या सहाही चोरीतील तीन अँड्रॉईड टीव्ही, 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, 13,200/- रु. किं. चे चांदीचे दागिने, 03 मोबाईल फोन, 01 टेंब, 02 सोनी कंपनीचे कॅमेरे, 01 रेडीओ, 02 स्पिकर, 01 वजनकाटा, 43000/- रु रोख रक्कम तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या 02 लोखंडीकटावण्या, 02 स्क्रू ड्रायव्हर, 02 पक्कड, 01 कटर तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली TVS N टॉर्क क्र. MH-07-AU-6859 ची दुचाकी असा एकूण 3,50,000/- रु (साडे तीन लाखाचा) किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशी माहिती आज सायंकाळी पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी ओरोस येथे दिली .या चोरी प्रकरणी केलेल्या कामगिरीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक राजेद्र मगदूम व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळीसह अन्य भागात झालेल्या सहा चोरीच्या पार्श्वभूमीवर आज ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक दहीकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी जिल्हा पोलिस उपअधिक्षक कृषिकेश रावले कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हयात गेल्या काही दिवसांत कुडाळ शहर व परीसरात अनेक ठिकाणी बंद घरांना चोरटयांनी लक्ष्य केलेले होते. चोरटे बंद घराची कुलुपे तोडून घरातील मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनेमध्ये वाढ झालेली होती. घरफोडी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा, चोरीचे गुन्हे उघडकीस येवुन चोरी झालेली मालमत्ता हस्तगत होणे आवश्यक होते. घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस येणेकरीता पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या.
पोलिस अधीक्षक दहीकर म्हणाले आम्ही दिलेल्या सूचनांप्रमाणे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात झालेल्या चोरी घर फोडीचे गुन्हे उघडकीस येणेकरीता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार केलेली होती. पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आपलं गोपनीय स्त्रोत सक्रिय केलेले होते. पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फत चोरट्यांबाबत माहीती काढण्याचे कार्य सुरु होते.मुदतीत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार/ प्रमोद काळसेकर यांना त्यांचे गोपनीय स्त्रोतांमार्फत एक संशयीत इसम दुचाकीवरुन परीसरात फिरत असल्याची माहीती व फोटो मिळाला. दुचाकीचे माहीतीवरून संशयीत इसमाचा शोध घेतला असता त्याचे नाव रामचंद्र ऊर्फ अभय अंकुश घाडी रा. आकेरी, घाडीवाडी ता कुडाळ असे असल्याचे समजुन आले. पोलीसांनी अभिलेखाची पडताळणी केली असता त्याचेवर सावंतवाडी पो. ठाणे 03 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळून आली. यावरुन सदर इसमाचा चोरीच्या गुन्हयात सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्याचा शोध घेत असता तो झाराप झिरो पॉईन्ट या ठिकाणी येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यास सापळा रचुन पो. नि. मगदूम व पथकाने त्यास शिताफीने दि. 08.06.2025 रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले,
चौकशी दरम्यान संशयीत आरोपीत याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. पण त्यास विश्वासात घेवुन तपास करता त्यांने गेल्या काही दिवसात पिंगुळी सुधा रेसीडन्सी, पिंगुळी उत्कर्षनगर, पिंगुळी काळेपाणी, पिंगुळी मोडकावड चिंदरकरबाडी, झाराप तिठा व साळगांव खेरवाडी अशा एकूण सहा ठिकाणचे बंद घराची कुलुप तोडून सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीत यांचेकडून चोरीस गेलेल्या तीन अँड्रॉईड TV, 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, 13,200/- रु. किं. चे चांदीचे दागिने, 03 मोबाईल फोन, 01 टेंब, 02 सोनी कंपनीचे कॅमेरे, 01 रेडीओ, 02 स्पिकर, 01 वजनकाटा, 43000/- रु रोख रक्कम तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या 02 लोखंडीकटावण्या, 02 स्क्रू ड्रायव्हर, 02 पक्कड, 01 कटर तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली TVS N टॉर्क क्र. MH-07-AU-6859 ची दुचाकी असा एकूण 3,50,000/- रु (साडे तीन लाखाचा) किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.मुदतीत आरोपीत यास न्यायालयात हजर केले असता त्याची 4 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर,अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले व उप विभागीय पोलीस अधिकारी, कणकवली घनशाम आढाव यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सहा.पोलीस निरीक्षक पालवे, पोलीस उपनिरीक्षक भांड, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, कृष्णा केसरकर, रामदास गोसावी, योगेश वेंगुर्लेकर,गणेश चव्हाण,महेश भोई, योगेश मांजरेकर, शशी शेखर प्रभु, योगीता गोलतकर यांनी केलेली आहे.