तळेगाव ढमढेरे,इनामगावात बिबट्या जेरबंद
शिक्रापूर (प्रतिनिधी ):- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे तसेच इनामगाव येथे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला. तळेगाव येथील ढमढेरे वस्ती येथे बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने अमोल ढमढेरे यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात दीड ते दोन वर्षे वयाचा बिबट्या बुधवारी पिंज-यात अडकला. समजलेल्या माहितीनूसार,बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी तेथील नागरिका़नी केली होती.बिबट्या पकडण्यासाठी अमोल ढमढेरे यांनी शेळी उपलब्ध करून दिली होती. पिंजरा लावण्यासाठी स्थानिक युवकांनी वनविभागाला मदत केली होती. शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील नलगेमळा येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता.या पिंज-यातही शुक्रवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाला असे समजले.