MENU
  • Total Visitor ( 136225 )

महापरिनिर्वाणदिन विशेष 

Raju tapal December 06, 2024 26

महापरिनिर्वाणदिन विशेष 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी एकत्र येतात. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जातिव्यवस्थेतील दलित समाजाच्या सुधारणेसाठी भरीव काम केले. अस्पृश्यतेची प्रथा संपविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करून, भगवान गौतम बुद्धांची शिकवण तळागाळातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांनी मागास समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त होईल आणि तो जीवन चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. परिनिर्वाण हे बौद्ध धर्माच्या अनेक मुख्य तत्वांपैकी एक आहे. यानुसार जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. यासोबतच तो जीवन चक्रातूनही मुक्त राहतो. पण निर्वाण मिळवणे सोपे नाही. त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावे लागते.

बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळं त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण ’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. बौद्ध धर्मात भगवान बुद्धांच्या वयाच्या ८० व्या वर्षी झालेल्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात. बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणातून समाजात बदल घडवून आणण्याचे ठरवले. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, यूएसए येथून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी कायदा आणि अर्थशास्त्र या विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. त्यांच्या शिक्षणाने त्यांना केवळ एक निपुण विद्वानच नव्हे तर समाजसुधारक बनण्याची प्रेरणा दिली.

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेबांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची राज्यघटना जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी पायाभरणी ठरली. यामध्ये सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा अधिकार सुनिश्चित करण्यात आला. बाबासाहेबांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कारही बौद्ध धर्माच्या नियमांनुसार करण्यात आले. दादर चौपाटी, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले ते ठिकाण आता चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ६ डिसेंबर रोजी बौध्द अनुयायी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दिवे आणि मेणबत्त्या पेटवतात. यावेळी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात येते. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दादर येथील चैत्यभुमीला मोठी गर्दी जमते. या दिवशी बौद्ध भिक्खूंसह अनेक लोक पवित्र गीते गातात आणि बाबासाहेबांच्या घोषणाही देतात.

Share This

titwala-news

Advertisement