• Total Visitor ( 700901 )
News photo

मुलामुलीसह विवाहीत महिलेची विहीरीत उडी मारून आत्महत्या 

Raju tapal February 02, 2026 158

मुलामुलीसह विवाहीत महिलेची विहीरीत उडी मारून आत्महत्या 

        

शिक्रापूर:- विवाहीत महिलेने ६ वर्षाच्या मुलासह, ४ महिन्याच्या मुलीसह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पाबळ येथे घडली. अहिल्या उर्फ भाग्यश्री राजू जाधव वय -३०,सार्थक राजू जाधव वय -६ वर्षे,गौरी राजू जाधव वय -४ महिने अशी मृतांची नावे असून हे कुटुंब मुळचे बीबी ता‌.लोणार जि‌.बुलढाणा सध्या पाबळ‌ येथील एकेरी माळ वीटभट्टीवर कामाला होते. शिक्रापूर पोलीसांनी मृत महिलेचा पती राजू पांडुरंग जाधव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे असे समजते.

जयश्री सुनील जाधव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर,पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह विहीरीतून बाहेर काढले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026