• Total Visitor ( 435829 )
News photo

मिना म्हसे यांचा बालकुमार साहित्य संस्थेकडून विशेष सन्मान

Raju tapal November 16, 2025 51

मिना म्हसे यांचा बालकुमार साहित्य संस्थेकडून विशेष सन्मान

        

विद्यार्थ्यांच्या वाचन चळवळीची साहित्य संस्थेकडून दखल

     

शिक्रापूर (प्रतिनिधी):- जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका मीना अशोक म्हसे यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथदिंडी,वाचन उपक्रम,लेखक आपल्या भेटीला यांसारखे उपक्रम राबवून वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत केल्याने त्यांच्या या कार्याची अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने दखल घेत त्यांच्या शाळेतील वाचनालयासाठी ५० पुस्तकांचा संच संस्थेचे विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते देत पुण्यातील एस एम जोशी सभागृहात त्यांचा विशेष 

सन्मान केला.

       या वेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत गिरीश 

प्रभुणे,राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड,सचिन बेंडभर पाटील मंचावर उपस्थित होते.

         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी ही हवेली तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा आहे. या शाळेत ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन आणि वाचन उपक्रम याबरोबरच इतरही उपक्रम राबवली जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमी प्रयत्नशील असते. स्वतः लिहीत असताना मिना म्हसे यांनी विद्यार्थ्यांनाही लिहिते करत त्यांना वाचनाची गोडी लावली. 

         विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुरेसी पुस्तके असावी यासाठी पुण्यातील समकालीन प्रकाशनाकडून त्यांनी १२ हजारांची पुस्तके शाळेला मिळवून दिली. वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी व विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची माहिती व्हावी यासाठी परिसरातील शाळांमध्ये  वाचन चळवळ वाढावी व औषधी वनस्पतींची लागवड व्हावी यासाठी त्या व्याख्यान देत असतात. 

       औषधी वनस्पतींचे उपयोग आणि महत्त्व व निरागस मने अशी त्यांची आजपर्यंत दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यातील औषधी वनस्पतींचे उपयोग आणि महत्त्व या पुस्तकाचा महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड यादीत समावेश असून या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. तसेच त्यांच्या या उपक्रमाला शिक्षण विवेकचा रोख रकमेचा राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला आहे. वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकातून त्यांचे नियमित लेखन असते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना ५० पुस्तके देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement