मुरबाड मध्ये चोरांची मांदियाळी
एकाच रात्रीत तब्बल 10 दुकाने फोडली
मुरबाड पोलीस घटनास्थळी
मुरबाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या
म्हासा बाजारातील अंकिता कॉम्प्लेक्स मधील 6 तर कान्होळ येथे 1 तर कर्जत कशेला येथे 3 अशी एकूण तब्बल 10 दुकाने चोरांनी एकाच रात्रीत फोडल्याने मुरबाड मध्ये ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोरांची मांदियाळी पसरली आहे. सदरील चोरीच्या प्रकारांमुळे परिसरातील दुकानदार,व्यवसायिक व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रा ही प्रसिद्ध बाजारपेठ असून रात्रंदिवस येथे वर्दळ चालू असते मात्र एकाच रात्री एवढी दूकाने चोरट्यांनी फोडली असल्याने म्हसा बाजारात पेठ मधील दुकानदार यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत घटना स्थळी मुरबाड पोलिस हजर झाले आहेत.
सदर दुकानांपैकी रोशन गोरले यांचे गणेश फर्निचर, सनी भोईर यांचे एसबीबी बेकर्स,अमोल कोकाटे यांचे ए के कलेक्शन, श्रीकांत कोकाटे यांचे श्रीकृपा गोळी बिस्किट, मनीष शिंदे यांचे मॅक्स कलेक्शन तर परेश चौधरी यांचे श्री चरण मेडिकल यांचा समावेश असून याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे करत आहेत.