मुर्टी ता.बारामती येथील ए टी एम मशिनची चोरी करणा-या दोघांना अटक
Raju Tapal
February 04, 2022
40
मुर्टी ता.बारामती येथील ए टी एम मशिनची चोरी करणा-या दोघांना अटक
निरा - मोरगाव रस्त्यावरील मुर्टी ता.बारामती येथील ए टी एम मशिनची चोरी करणा-या दोघांना पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.ए टी एम मशिनचे चोरी करणारे दोन्ही आरोपी राजस्थानमधील असून बनवारीलाल उर्फ राजू मोहनलाल मीना वय - ३४ रा.दातारामगड , जि.सिखर राजस्थान, बाबूलाल उर्फ पप्पू गोपाळ चौधरी वय - ३० रा. दातारामगड जि.सिखर राजस्थान अशी दोघा आरोपींची नावे आहेत.
बोलेरो व पिकअप चा वापर करून या दोघांची टोळी ए टी एम मशीन चोरत होती.
बारामती तालुक्यातील मुर्टी येथील टाटा इंडिकॅश कंपनीचे मशीन १६ जानेवारीला पहाटे चोरीस गेले होते.
या घटनेत ४ लाख १२ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
मुर्टी येथील ए टी एम चोरीच्या घटनेसंदर्भात ए टी एम मशीन चोरट्यांनी पळविले या शिर्षकाखाली टिटवाळा न्यूजने दि. १७ जानेवारीला वृत्त प्रसारित केले होते.या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून चालू होता. त्यांना वडगाव निंबाळकर पोलीसांकडून सहकार्य केले जात होते.
या गुन्ह्यामध्ये पांढ-या रंगाच्या बोलेरो वाहनाचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले.त्याचा मागोवा घेत रस्त्यावरील सी सी टी व्ही फुटेज पोलीसांनी तपासले असता ही गाडी शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात असल्याचे दिसून आले.
गुन्ह्यातील संशयित याच वाहनाचा वापर करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीसांना मिळाली.
बुधवारी २ फेब्रुवारीला रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मदतीने वाहनाचा शोध घेण्यात आला.
आरोपी बनवारीलाल मीना हा त्याचा मित्र बाबुलाल चौधरी याच्यासोबत या वाहनाचा वापर करत होता. त्याच्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यातील तपास निष्पन्न झाला. अधिक चौकशीत याच वाहनाचा वापर करून जवळा ता.पारनेर जि.नगर येथीलही एटी एम मशीन चोरी केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासंबंधी तपास केला असता हे वाहन चोरीला गेल्याची तक्रार मूळ मालकाने तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केल्याचे दिसून आले.
Share This