• Total Visitor ( 485262 )
News photo

शिक्षक परिषद पुणे विभाग कार्याध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे यांची बिनविरोध नियुक्ती 

Raju Tapal publisher April 15, 2026 33

शिक्षक परिषद पुणे विभाग कार्याध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे यांची बिनविरोध नियुक्ती 



शिक्रापूर:- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे विभाग कार्याध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राचार्य संजीव जयवंतराव मांढरे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य पदावरून संजीव मांढरे सर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. संजीव मांढरे सर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्षपद भूषविले असून त्यात त्यांनी चांगले योगदान दिल्याबद्दल त्यांना पुणे विभागांतर्गत येणारे ५ जिल्हे,५ महानगरपालिका तसेच ५७ तालुक्यांची जबाबदारी दिली आहे. आपल्या नियुक्तीबाबत बोलताना सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे सर यांनी सांगितले,या पदाचा उपयोग शिक्षकांच्या समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी करणार आहे. पुणे विभागातील सर्व शिक्षकांसाठी वेळ देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार आहे.सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून बिनविरोध केलेली निवड हा खूप मोठा सन्मान आहे .पाच जिल्हे,पाच महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांच्या कल्याणासाठी जे जे करता येईल ते करण्याचा मानस आहे. शासन दरबारी शिक्षकांचा सन्मान वाढावा. शालेय कामकाजाव्यतिरिक्त दिली जाणारी इतर कामे कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संघटनेची ताकद वाढवण्यासाठी नवीन सभासद नोंदणी,शिक्षक जागृती करणार आहे. असे आपल्या नियुक्तीबाबत सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे सर यांनी सांगितले. दरम्यान सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे यांची शिक्षक परिषदेच्या पुणे विभाग कार्याध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी,पुणे विभाग कोषाध्यक्ष महेश शेलार,पुणे विभाग सहमहिला आघाडी प्रमुख डाॅ.सुजाता कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement