उंबरपाडा येथे रामनवमी साजरी
मुरबाड :- समाधीस्थ परमपूज्य योगी रिद्धीनाथ महाराज टाकेश्वर मठ व समाधीस्थ परमपूज्य योगी रामनाथ महाराज संगमेश्वर मठ,मंथ योगी फुलनाथ महाराज टाकेश्वर मठ यांच्या कृपा आशीर्वादाने,सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील श्रीराम रामनवमी निमित्ताने मौजे उंबरपाडा (सरळगाव) श्रीराम जन्मोत्सव सकाळी 9 ते 12 या वेळात पालखी सोहळा व तदनंतर महाप्रसाद कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले आले होते.योगी यशनाथ महाराज टाकेश्वर,योगी गोपीनाथ महाराज संगमेश्वर मठ हे उपस्थित होते. हनुमान मंदिर येथून पालखी सोहळा संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून सदर वेळी प्रत्येक घरोघरी भगिनी वर्गाकडून पालखीचे स्वागत व पूजा करण्यात आली. सर्वांच्या घरासमोर गुढी उभारण्यात आली होती. सदर वेळी योगी यशनाथ महाराज यांनी प्रवचनाद्वारे श्रीराम जन्मा बाबत मार्गदर्शन केले.मुरबाड तालुक्यातील सर्व वारकरी,कीर्तनकार प्रवचनकार,गायक,वादक कार्यक्रमास उपस्थित राहून राम नामाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.ह भ प श्री हिरु हरी घुडे सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या निवासस्थानी रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला असून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.