स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेच्या वतीने भीमज्योतीचे उत्साहात स्वागत
शिक्रापूर:- शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या वतीने विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने पुण्यातून आणलेल्या भीमज्योतीचे स्वागत करण्यात आले. विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांच्या हस्ते ज्योतीला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी फेटा बांधून भीमसैनिकांचे स्वागत करण्यात आले. दरवर्षी पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तळेगाव ढमढेरे येथील सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या वतीने भीमज्योत आणली जाते. स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेच्या वतीने भीमज्योतीचे स्वागत करण्यात आले. विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे
भारतातील महान विचारवंत, समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. त्यांच्या विचारांनी समाजात समानता,न्याय आणि मानवतेची जाणीव निर्माण झाली असे विचार त्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. यावेळी माजी उपसरपंच मनोज आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित,जावेद बागवान,जगन्नाथ आल्हाट,सूरज कोळसे,गुलाबराव गवळे,हवेली तालुका तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास नरके,सुधीर जगताप उपस्थित होते. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे,प्रशालेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे यांनी शुभेच्छा दिल्या.