स्वातंत्र सैनिक रायकुमार गुजर प्रशालेत उत्कृष्ट वाचक गुणगौरव सोहळा संपन्न
शिक्रापूर:-शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संचलित स्वा.सै.रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे या प्रशालेमध्ये विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांचा "उत्कृष्ट वाचक गुणगौरव" समारंभ आयोजित करण्यात आला होता. शालेय ग्रंथालयाच्या माध्यमातून वर्षभरात जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक वर्गातून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक निश्चित करून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रायटिंग पॅड देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपाली ढमढेरे यांनी केले,तर प्रास्ताविक प्रशालेचे ग्रंथपाल शंकर उकले यांनी केले. प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी आभार मानले.
गौरव प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये –
इयत्ता पाचवी: भोसले विद्या अविनाश,व्यास प्रिन्स भरत,बनसोडे आकांशा अमोल
इयत्ता सहावी: म्हेत्रे ईश्वरी गोपीनाथ,मलवडकर शक्ती सतीश,शितोळे आयुष सचिन
इयत्ता सातवी: ढमढेरे शिवराज पोपट,गायकवाड आयुष राजू,तोडकर देविका योगेश,सोनवणे यामिनी दिलीप
इयत्ता आठवी: बंडेवार ओम साई,शिंदे राधिका तुकाराम,शेख रुखसार महेबूब,शिंदे कार्तिकी बाळासाहेब,ढमढेरे स्वरांजली रामकृष्ण. इयत्ता नववी: राम गायत्री चंद्रमा,पंडित रोशनी रोहित,जाधव सई अदिक,मस्तुद नम्रता सुभाष,कदम भूमिका चंद्रकांत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड वाढण्यास प्रोत्साहन मिळत असून,शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे यांनी केले. तसेच या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.