• Total Visitor ( 707966 )
News photo

पीडीसीसी बँकेची १०९ वी वार्षिक सभा भावनिक वातावरणात

Raju Tapal publisher September 15, 2026 53

पीडीसीसी बँकेची १०९ वी वार्षिक सभा भावनिक वातावरणात



दादांनी घालून दिलेली आर्थिक शिस्त,कार्यक्षमतेची परंपरा पुढे नेणार;पीडीसीसी बँकेला देशातील अग्रगण्य बँक बनवण्याचा निर्धार



 आळंदी (गौतम पाटोळे):- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भावनिक वातावरणात पार पडली. यावेळी बँकेशी तब्बल ३२ वर्षे ५ महिन्यांचे अतूट नाते असलेल्या दादांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. बँकेची आर्थिक शिस्त, कर्जवाटप,कर्जवसुली तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिल्याचे नमूद करण्यात आले. मार्च २०२६ अखेर पीडीसीसी बँकेची उलाढाल ३० हजार ७६८ कोटी रुपये,तर निव्वळ नफा ७९ कोटी रुपये झाला आहे. बँकेच्या या प्रगतीबद्दल संचालक मंडळ,अधिकारी-कर्मचारी आणि सभासदांचे अभिनंदन करण्यात आले. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे हा दादांचा कायम आग्रह होता. शेतीपूरक व्यवसायांना अधिक वित्तपुरवठा करून शेतकऱ्यांचे उत्पन्नचक्र मजबूत करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज सवलत वाढविण्याचे आवाहन

मागील वर्षीच्या टिपणात शेतकरी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर सवलतीचा मुद्दा दादांनी मांडला होता. त्यानुसार देश-विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या मिळणारी ४ टक्के व्याजदर सवलत ५ टक्के करण्याचे आवाहन बँकेला करण्यात आले.

दादांनी घालून दिलेली आर्थिक शिस्त, कार्यक्षमता आणि विश्वासाची परंपरा पुढे नेत पीडीसीसी बँकेला देशातील अग्रगण्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील,असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी हित,सहकाराचा विश्वास आणि बँकेची ताकद या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम व समृद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे,कृषिमंत्री दत्ता भरणे,बँकेचे चेअरमन,संचालक मंडळाचे सदस्य,अधिकारी-कर्मचारी,सभासद तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement