• Total Visitor ( 711415 )
News photo

मतदार यादी सुधारित वेळापत्रक जाहीर....

Raju Tapal publisher October 02, 2026 41

मतदार यादी सुधारित वेळापत्रक जाहीर....



१८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसाठी मतदार नोंदणीची सुवर्णसंधी १२ ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची मुदतजिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन:- भारत निवडणूक आयोग यांच्याकडील दि.२६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दावे व हरकती सादर करण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट २०२६ ते १२ ऑक्टोबर २०२६ अशी मुदतवाढ दिलेली असून अंतिम मतदार यादी दि.१६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिध्द करावयाची आहे.

 गैरहजर / स्थलांतरित किंवा इतर कारणामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करु न शकलेल्या मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणांहून मतदार यादीमध्ये नव्याने नाव अंतर्भूत करण्यास दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये संधी उपलब्ध झालेली आहे. त्याच प्रमाणे ऑक्टोबर, २०२४ नंतर मतदार यादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला नसल्याने दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविता आले नव्हते. आता, दि.०१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव अंतर्भूत करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार नवमतदार तसेच अन्यथा पात्र असून प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीमधील अस्तित्वात असलेल्या नोंदीमध्ये सुधारणा करणे तसेच यादीतील नावाची वगळणी करणे यासाठी दावे व हरकतींचा कालावधी दि.३१ ऑगस्ट, २०२६ ते १२ ऑक्टोबर, २०२६ असा आहे. याच कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजित करण्यात आलेले आहे.

ठाणे जिल्हयातील १८ विधानसभा मतदारसंघातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी / मतदान केंद्रावर शनिवार, दि. ०३ ऑक्टोबर २०२६, रविवार, ०४ ऑक्टोबर २०२६ आणि शनिवार, दि.१० ऑक्टोबर २०२६, रविवार दि.११ ऑक्टोबर २०२६ या दिवशी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत. या कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यत दावे व हरकती मतदारांना दाखल करता येतील. (नाव सामाविष्ट करण्यासाठी नमुना-६, दुरूस्ती साठी नमुना-८, वगळणीसाठी नमुना-७) (त्यासोबत घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याबरोबर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांना उपस्थित राहण्याच्या सूचना संबंधित राजकीय पक्षांमार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच या विशेष शिबिरांमध्ये महिला तसेच दिव्यांगांच्या समावेशनासाठी विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे.

जिल्हयातील पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करणेसाठी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement