• Total Visitor ( 428038 )
News photo

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन 

Raju tapal February 01, 2026 129

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन 

        

शिक्रापूर:- लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार यांचे वयाच्या ५० वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी मध्यरात्री दोन वाजता निधन झाले.

ते सध्या पुण्यातील वडगाव शेरी येथे राहात होते. शनिवारी रात्री १० वाजता ते ड्युटी संपल्यानंतर वडगाव शेरी येथे घरी गेले.त्यांना मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला.त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. १२ आॅक्टोबर २०२४ रोजी त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारला होता.२०२५ मध्ये त्यांना सुरक्षित पुणे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते अत्यंत शांत संयमी स्वभावाचे अधिकारी होते. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे समजते.

त्यांच्या मागे आई,एक मोठा भाऊ,पत्नी,मुलगा सिद्धेश,मुलगी सिद्धी,असा परिवार असून मुलगी सिद्धी बी ए एम एस चे शिक्षण घेत आहे असे समजते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement